कामुदेगांव नगरपंचायत निवडणुकीत बहुजन जनता दल उमेदवार प्रमोदिनी डावखुरे विजयी !!

कामुदेगांव नगरपंचायत निवडणुकीत बहुजन जनता दल उमेदवार प्रमोदिनी डावखुरे विजयी !!

         पुणे दि, राज्यात पार पडलेल्या सार्वजनिक नगरपंचायत निवडणुकीत बहुजन जनता दलाने राज्यातील नगरपंचायत निवडणुकीमध्ये ८५ उमेदवार स्वबळावर लढविले होते त्यापैकी कामुदेगांव नगरपंचायत वार्ड ६ मधिल बहुजन जनता दल उमेदवार प्रमोदिनी संजय डावखुरे यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून १९० मतांनी विजयी प्राप्त केला.

       प्रमोदिनी डावखुरे ह्या बहुजन जनता दलाच्या वतीने नि्वडुन आलेल्या राज्यातील पहिल्या महिला उमेदवार आहेत, प्रमोदिनी डावखुरे यांच्या विजयाने राज्यातील राजकारणामध्ये बहुजन जनता दलाने सक्रिय सहभाग नोंदविला अशी भावना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी बहुजन जनता दल उमेदवार प्रमोदिनी डावखुरे ह्या विजय झाल्या बद्दल व्यक्त केली.

       बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी नवनिर्वाचित बहुजन जनता दलाचे विजय झालेल्या उमेदवार प्रमोदिनी डावखुरे यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले असून कामुदेगांव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन जनता दलाच्या उमेदवार प्रमोदिनी डावखुरे यांना वार्ड क्र. ६ मधिल सर्व घटकांच्या नागरिकांनी मतदान करुन शिव शाहू फुले डॉ आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असलेल्या बहुजन जनता दलाला विजय प्राप्त करून दिल्याबद्दल बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी मतदारांचे आभार मानले यावेळी वार्डातील मतदार आणि नागरीक तसेच बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week