ग्रुप ग्रामपंचायत कुंभे निवडणूक सरपंच पदासाठी जोर गावची सुशिक्षित तरुण तडफदार उमेदवार कु. हेमांगी सावंत यांना वाढता पाठिंबा !!

ग्रुप ग्रामपंचायत कुंभे निवडणूक सरपंच पदासाठी जोर गावची सुशिक्षित तरुण तडफदार उमेदवार कु. हेमांगी सावंत यांना वाढता पाठिंबा !!

      रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुंभे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुंभे, मांजुरने, केलगण, जोर या गावांचा समावेश आहे या ग्रामपंचायती मध्ये कित्येक वर्षे खेळीमेळीचे वातावरण होते पण यंदा जोर गावाकडे सरपंच पदाची वेळ होती परंतु या ग्रामपंचायतीची सरपंच पदांची निवडणूक बिनविरोध झाली नाही म्हणून ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी कुंभे ग्रुप ग्रामपंचायती मध्ये सरपंच पदासाठी जोर गावची सुशिक्षित तरुण तडफदार उमेदवार कु. हेमांगी चंद्रकांत सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. हेमांगी सावंत या सुशिक्षित असून यांना ग्रामपंचायती पासून जिल्हा स्तरावरील सर्व कार्यालयाचा तसेच रायगड जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे या निवडणुकीत हेमांगी सावंत यांना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बाळू सिताराम भद्रिके आणि गणेश ढवले यांच्यासह सर्व पुढारी, साधु संत, शिक्षकांचा तसेच गावकऱ्यांचा वाढता पाठिंबा असल्यामुळे तिचे पारडे जड आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week