
भारतीय श्रमिक शक्ती संघाने पालघर येथे कंपन्यात आपल्या युनियनचा झेंडा रोवला !
भारतीय श्रमिक शक्ती संघाने पालघर येथे कंपन्यात आपल्या युनियनचा झेंडा रोवला !
भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या वतीने एमआयडीसी तारापूर जिल्हा पालघर येथे मेसर्स ब्रस्सिका फार्मासिटिकल कंपनी मेसर्स केशवा ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड मेसर्स डी आर ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड मिसर्स साळवी केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड मेसर्स ग्लेन सीन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांमध्ये युनियन स्थापन करण्यात आली, सर्व कारखान्यांच्या गेटवर सन्मानपूर्वक युनियनचा फलक लावण्यात आला सदर प्रसंगी कामगारांनी व व्यवस्थापनाने युनियन पदाधिकाऱ्यांचे उस्फुर्त स्वागत करीत मिठाई वाटली.
भारतीय श्रमिक शक्ती संघाचे प्रमुख सल्लागार खासदार श्री राजेंद्र गावित यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट नितीन शिवकर, कार्याध्यक्ष श्री उपेंद्र पाटील कामगार नेते व संघटनेचे उपाध्यक्ष श्री अनिल गणाचार्य व सरचिटणीस श्री जिमी डे यांच्या माध्यमातून कारखान्यांमध्ये संघटना स्थापन करण्यात आल्या. सदर प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल संघटनेने पालघर जिल्ह्याचे कामगार उपायुक्त बरोबर चर्चा करून कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्याकरिता लढा करू व कामावरून काढण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा त्यांचे काम मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.