भायखळ्यात गणेशोत्सवात जाहिरातीतुन आमदार यामिनी जाधव यांचाच जनसंपर्क !!
भायखळ्यात गणेशोत्सवात जाहिरातीतुन आमदार यामिनी जाधव यांचाच जनसंपर्क !!
भायखळ्यात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन गट पडले असून भायखळ्यातील आमदार यामिनी जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून भायखळा विभागात आमदार यामिनी जाधव यांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणूक आता लवकरच येऊ घातली असून अनेक राजकीय पक्ष आपापले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न विविध मंडळांना जाहिरात आणि बॅनर देऊन करत असतात. त्यातच भायखळा विभागात मोठ्या प्रमाणात आमदार यामिनी जाधव यांनी विभागातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला बॅनर, प्रवेशद्वारावर जाहिरात देऊन आपला जनसंपर्क वाढवला आहे.
त्यांना विभागातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांची साथ मिळत आहे. भायखळा येथे प्रत्येक नाक्यानाक्यावर अनेक सार्वजनिक मंडळामध्ये त्यांचेच प्रवेशद्वार आणि बॅनर पाहायला मिळत आहेत. तसेच जाधव या स्वतः भायखळ्यातील सर्व मंडळामध्ये आणि घरोघरी गणपतीचे दर्शन घेताना दिसत आहेत. आमदार यामिनी जाधव या सुसंस्कृत, उच्चशिक्षित असून त्या एक महिला आहेत त्यामुळे त्यांना लोकांचे सामाजिक प्रश्न आणि विशेष करून महिलांचे प्रश्न काय आहेत याची त्यांना जाणीव आहे. तसेच त्यांनी भायखळा विभागातील अनेक नागरिकांचे सामाजिक आणि विधायक प्रश्न सोडवले असून अनेक नागरिक त्यांच्याकडे समस्या घेऊन जातात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे आम्ही आमदार यामिनी जाधव यांना सदैव साथ देणार असल्याची माहिती स्थानिक महिला रोहिणी माने यांनी दिली. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भायखळा, माझगाव विभागात सामाजिक कार्य करत असून लोकांच्या समस्या सोडवत आहोत. कोरोना काळात देखील आम्ही रस्त्यावर फिरून नागरिकांना अन्नधान्य, जेवण तसेच मोफत औषधे देऊन नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेतली आहेत. या गणेशोत्सवात देखील अनेक ठिकाणी आम्ही जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहोत. यापुढे देखील आम्ही हा समाजसेवेचा वारसा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सदैव सुरु ठेवणार असल्याची माहिती आमदार यामिनी जाधव यांनी दिली.