मांडवी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
मांडवी येथील शिवसेना शाखा प्रमुख स्वप्नील कोळी यांनी मांडवी येथे बद्री बाग याठिकाणी विभागातील नागरिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला विभागातील नागरिकांनी तसेच युवकांनी तसेच महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे शिबिर यशस्वी केली या शिबिरात 250 आणि त्यापेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या.
या शिबिराला भेट देण्यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ तसेच उपविभागप्रमुख विकास मयेकर, नगरसेविका सोनम जामसुतकर, माजी नगरसेवक अरुण दुधवडकर, शंकर झोरे आणि इतर मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली. आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केले असून यापुढे देखील असेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे अशी माहिती शिवसेनेचे शाखाप्रमुख, आयोजक स्वप्नील कोळी यांनी याठिकाणी दिली. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकतो. शाखाप्रमुख स्वप्नील कोळी यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला असून त्यांच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो अशी माहिती माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी या ठिकाणी व्यक्त केली. या रक्तदान शिबिराला विभागातील नागरिकांनी, महिलांनी आणि युवकांनी सहभागी होऊन रक्तदान केले.