मित्राचा निर्घुण खून करुन फरार झालेल्या आरोपीस २१ वर्षानंतर उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश !!
मित्राचा निर्घुण खून करुन फरार झालेल्या आरोपीस २१ वर्षानंतर उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश !!
मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तांलयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या व उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन नमुद गुन्हयाची उकल करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते.
घटनाक्रम :-
विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २८३/२००५ भारतीय दंडविधान संहिता कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हयातील फिर्यादी श्री. रत्नाकर शंकर चव्हाण वय ५१ वर्ष रा. अर्नाळा बंदरपाडा, किल्ला रोड, तालुका वसई, जिल्हा पालघर यांनी त्यांचा मयत चुलत भाऊ दिलीप तुकाराम चव्हाण वय ३० वर्ष यास कोणीतरी अज्ञात आरोपीताने अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी अज्ञात हत्याराने डोक्यात गंभीर दुखापती करुन जीवे ठार मारले. त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भाटीबंदर ते चिखल डोंगरीकडे जाणा-या बंधाऱ्यावर रोडचे बाजूला आगाशी भाटीबंदर गावचे हद्दित खाडी किनारी फेकुन दिल्याबाबतच्या तक्रारीवरुन दिनांक २७/१२/२००५ रोजी सदरचा गुन्हा नोंद आहे.
गुन्हयाची उकल :-
नमुद गुन्हयाचा गुन्हे शाखा कक्ष-२ वसई मार्फत नव्याने समांतर तपास सुरु करुन गुन्हयाचे फिर्यादी तसेच घटनास्थळाचे आजूबाजचे परीसरातील त्यावेळी हजर असलेले साक्षीदार यांचेकडे गुन्हयाबाबत सखोल तपास करण्यात आला. नमुद गुन्हयातील निष्पन्न आरोपीचे उत्तरप्रदेश येथील मुळ गावी गुप्त बातमीदाराकरवी माहीती प्राप्त करुन आरोपी हा त्याचे मूळ गावी लपत-छपत राहत असल्याची खात्रीलायक माहीती प्राप्त झाली. सदर आरोपीताचे प्राप्त माहीतीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाव्दारे मु. तळोंगज, मनोरी, ता. पुरामुप्ती, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश येथे तपास पथक रवाना करुन आरोपीला दिनांक २५/०६/२०२६ रोजी अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष ०२, ला यश आले.
राजेश सुरेश सोनकर, वय-४१ वर्ष, रा. तळोंगज मनोरी, तालुका पुरामुप्ती कोसंची, जि प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश या आरोपीकडे गुन्हयाबाबत तपास करता त्याने आरोपी व मयत हे दोघे मित्र होते. ते अर्नाळा येथे अर्नाळा हिंदू हॉटेल येथे साफसफाईचे काम करीत असताना आरोपीचे पत्नीवर मयत याच्या ओळखीच्या ईसमाने जबरदस्तीने संभोग केला होता व सदर बाबत मयत याने मदत केल्याचा राग मनात धरुन त्याने मयताचा खून केल्याची माहीती कथन केली आहे. सदर आरोपीस गुन्हा केल्यानंतरच्या त्याचे वास्तव्याच्याबाबत तपास करता तो लखनऊ येथे ५ ते ६ वर्ष राहीला, त्यानंतर तो प्रयागराज येथे गेल्या १५ वर्षापासून स्वतःचे अस्तीत्य लपवून राहत असल्याची व ई रीक्षा चालवून त्याचा उदरनिर्वाह करीत असल्याची माहीती कथन केली आहे.
उपरोक्त कामगिरी मा.श्री. निकेत कौशिक - पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंत्रे - अपर पोलीस आयुक्त, श्री. संदीप डोईफोडे - पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ - सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा कक्ष २ वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उप निरीक्षक संतोष घाडगे, अजित गिते, सहाय्यक फौजदार संजय नवले, मुकेश पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, पोलीस अंमलदार अनिल सावळे, अक्षय बांगर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे रामेश्वर केकान, सर्व नेमलेले गुन्हे शाखा कक्ष ०२ वसई तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, नेमलेले सायबर पोलीस ठाणे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.
(सौजन्य - प्रीती तिवारी)