ऑनलाईन जुगारावर गुन्हे शाखा वसई २ ची कडक कारवाई !!

ऑनलाईन जुगारावर गुन्हे शाखा वसई २ ची कडक कारवाई !!

ऑनलाईन गेमिंग व बेटींग करणाऱ्या परराज्यातील टोळीस लाखो रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण कक्ष २ वसई यांना यश.


     दिनांक २१/०९/२०२६ रोजी २१.५० वा. चे पुर्वी गुन्हयाचे घटनास्थळ असलेल्या सनटेक हिल व्हयु १ अॅन्ड लेकशोअर को. ऑफ हौसिंग सोसायटी, बिल्डींग क्रमांक १३ रुम क्र. २०४, नायगाव पूर्व, ता. वसई जि. पालघर येथे अटक आरोपी (१) फुरकान अहमद जसीमुद्दीन अन्सारी, वय २१ वर्षे याने त्याचे इतर ०६ साथीदारांसह संगणमत करुन Reddy Book व Reddy 66 या पॅनलव्दारे अनधिकृतरित्या क्रिकेट, फुटबॉल, रमी, व इतर खेळांवर ऑनलाईन बेटींग तसेच ऑनलाईन गेमिंग असा जुगार खेळवून सदर ऑनलाईन जुगाराच्या पैशांचा व्यवहार करण्यासाठी वेगवेगळया इसमांचा विश्वास संपादन केला.


      त्यांच्या नावावर सिम कार्ड तसेच बँकेत खाते खोलून सदर बैंक खात्याचा व सिम कार्डचा वापर त्यांचे अपरोक्ष करुन नमुद बैंक खाते व सिम कार्ड धारक हे स्वताः वापरत असल्याचे लबाडी व कपटाने भासविले. सदर बैंक खात्याचा स्वःताच्या आर्थिक फायदयाकरीता वापर करुन बैंक खातेदारकांची व सिम कार्ड धारकांची फसवणुक करुन सदर बँक खात्याचा ऑनलाईन गेमिंगचे पैश्याच्या देवाण घेवाण करण्याकरीता गैर वापर करुन ऑनलाईन गेमिंगचे पैसे वर नमुद जप्त लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन अशा इलेक्ट्रीक साधनांचा वापर करुन सदर खात्यामधील पैसे इतर खात्यांमध्ये वळते करीत असताना वर नमुद ५,७५,०००/- रुपयांच्या १ राऊटर, २९ मोबाईल, २ टॅब, ३ लॅपटॉप २ कैमेरे ३० सिमकार्ड, २ हिशोबाच्या नोटबुक आणि १ चार चाकी वाहन या जप्त मुद्देमालासह मिळून आला असल्याने त्याबाबत नायगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्रमांक ८६७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९ (२),१११,३ (५) सह माहीती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६(सी), ६६(डी), महाराष्ट्र जुगार अॅक्ट अधिनियम १८८७ चे कलम ४(ए) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.


गुन्हयाची उकल :-


     (भारत-पाकिस्तान एशिया कप २०२६ ची फायनल मॅच चालू असताना सदर मॅचवर ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या आरोपींना पोरवोरीम, नॉर्थ-गोवा येथून अटक करण्यात आले.)


     नमुद कारवाईचे अनुषंगाने नायगाव पोलीस ठाणे येथे सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. वरीष्ठांच्या आदेश व मार्गदर्शनाने तांत्रीक विश्लेक्षण व गुप्त बातमीदाराकडून गुन्हयातील वाँटेड आरोपीतांचे बाबत केलेल्या निरंतर तपासात यांचे भारतीय नंबर व इंटरनॅशल मोबाईल नंबर प्राप्त करण्यात आले. नमुद मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे गुन्हयातील आरोपीत यांचे नॉर्थ गोवा येथील लोकेशन प्राप्त करुन आरोपीत नं (१) नितिन मोहनकुमार माखिजानी वय ४५ वर्ष (२) करन सुरेश तनयानी वय २१ वर्ष (३) दिपक अनिल बत्रा वय २६ (४) हीतीक विनोद खूबचंदानी वय २६ वर्ष (५) राकेश संतरामदास वाधवानी वय ३० वर्ष (६) मोहीत हंसराज पोपटानी वय २४ वर्ष यांना Nitin Online Book या पॅनलवरुन भारत-पाकिस्तान एशिया कप २०२६ ची फायनल मॅचवर ऑनलाईन बेटींग करताना दिनांक ०३/१०/२०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले.


       त्यांच्या ताब्यातून घरझडतीतून ४,१४,०००/- रुपये किंमतीचे एकुण ऑन लाईन गेमिंग करीता वापरलेले एकुण ३३ मोबाईल, ४ लॅपटॉप, चार्जर, ७८ पासबुक व चेकबुक, ६९ एटीएम कार्ड, २ सी सी टी व्ही कॅमेरे, ४० सिमकार्ड आणि १ नोटबुक तसेच ९ आरोपीतांच्या झडतीतून मिळालेले मोबाईल असा मुद्देमाल गोवा या परराज्यात जावून तपास करुन हस्तगत करण्यात आला.


      नमुद आरोपीत यांचेकडे केलेल्या तपासात नमुद गुन्हयातील प्रमुख अटक आरोपी नं (७) निकोलस उर्फ निक्की नरेंद्र रंगारी, वय ३४ वर्षे, आणि आरोपीत नं (८) दिपक गोविंदराम धीरवानी वय ४४ वर्ष हे पुणे येथून नागपूर येथे ट्रॅव्हल्सने पळून जात असल्याची माहीती प्राप्त करुन सदर आरोपी नं ७ व ८ यांना प्रवासात असताना पुणे-अहिल्यानगर रोडवरुन दिनांक ०५/०९/२०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.


      नमुद गुन्हयात ऑनलाईन बेटींगच्या गुन्हयात Reddy Book च Reddy 66 तसेच Nitin Online Book या पॅनलवरुन ऑनलाईन बेटींग व गेमिंग करणा-या ९ आरोपीतांना अटक करुन त्यांचे ताब्यातून एकुण ९,८६,०००/- रुपयाचे एकुण ६३ मोबाईल, ७ लॅपटॉप, २ टेंब, १ राऊटर, २ कॅमेरे, ७० सिमकार्ड, ५८ ए टी एम कार्ड, ८९ पासबुक चेकबुक असा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कक्ष ०२ गुन्हे शाखा, मीरा भाईंदर वसई विरार हे करीत आहेत.


       उपरोक्त कामगिरी मा. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. संजय शिंत्रे, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. गोंडुराम बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त सारे, (प्रकटीकरण) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष २ वसईचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन पाटील, पोलीस निरीक्षक अचिराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, संतोष घाडगे, सहाय्यक फौजदार मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, पोलीस हवालदार सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहुल कर्पे, पोलीस अंमलदार अनिल साबळे, पोलिस शिपाई अक्षय बांगर, महाराष्ट्र सुरक्षा बल - आकाश जाधव, मंगेश भगत सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष ०२ वसई, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर पोलीस ठाणे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे