भव्य रोजगार मेळावा !
खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने राज्यव्यापी ऑनलाइन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याची नोंदणी दिनांक 7 डिसेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत असून ऑनलाईन पद्धतीने महाभरती 12 ते 13 डिसेंबर पर्यंत www.yodhaat80.org www.rojgaar.mahaswayam.gov.In या वेबसाईटवर असेल. तरी सर्व बेरोजगार युवक आणि युवतींनी वरील वेबसाईटवर नोंदणी करावी असे आवाहन दक्षिण मुंबई जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन नारकर, भायखळा तालुका अध्यक्ष प्रविण खामकर यांनी केले आहे.