मुंबईतील मेघवाडी परिसरात - खुनाचा प्रयत्न !!
दि.०८/१०/२०२६ रोजी २२:४० वा. च्या सुमारास फिर्यादी राहुल सनया भगत, वय - ३६ वर्षे, धंदा- बीएमसी पार्किंगमध्ये नोकरी, रा.ठी. मालपाडोंगरी, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व) मुंबई यांचा भाऊ रवी सनया भगत, वय-३४ वर्षे, याला त्याचा मित्र अटक आरोपी पुरुष, वय-३० वर्षे याने फिर्यादींचा भाऊ रवीकडुन घेतलेल्या उसण्या पैशाची मागणी केल्याने त्यास राग येवून अटक आरोपीने कांतीलाल कंपाऊंड, राघव सुघर चाळ, बालवाडी जवळ, जिजामाता रोड, पंप हाउस, अंधेरी, मुंबई येथे तो राहण्यास असलेल्या खोलीत त्यास घेवुन जावुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक धारदार हत्याराने त्याचे गळयावर व छातीवर वार करुन मध्यभागी गंभीर दुखापत केली आहे.
म्हणुन राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि.०९/१०/२०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०१/२६ व कलम १०९ (१), बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.