मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले भायखळा, माझगाव भागातील गणरायाचे दर्शन !!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले भायखळा, माझगाव भागातील गणरायाचे दर्शन !!

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगांव, ताडवाडी येथे भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतप्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव, यशवंत जाधव, सिनेट सदस्य निखिल जाधव, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी भायखळ्याच्या ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्तीचे दर्शन घेतले आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी काळाचौकीचा महागणपतीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी माझे सहकारी विजय (दाऊ) लिपारे आणि मंडळांचे पदाधिकारी अनिल जाधव, अमरदिप गोसावी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणेशभक्तांच्या गर्दीलाही मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.

      अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या माझगांवच्या मोरयाच्या चरणी लीन होऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते गौरव कासले, राजा म्हात्रे, सुशील नारकर आदींशी संवाद साधला.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week