
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर करूनही एसटी कामगारांचा पगार थकला !
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर करूनही एसटी कामगारांचा पगार थकला !
लॉकडाऊन काळात बेस्टप्रमाणे ग्रामीण भागासह शहरी भागात इमानेइतबारे सेवा पुरवणाऱ्या एसटी कामगारांचा पगार गेल्या पंधरवड्यापासून थकलेला आहे. यामुळे एसटी कामगारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे राज्याचे परिवहन मंत्री एडवोकेट अनिल परब यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी एसटी कामगारांकडून केली जात आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता ग्रामीण भागातून मुंबई आणि उपनगरात कोरोना काळात जनतेची सेवा करण्यासाठी बसवाहक आणि बस चालक सामील झाले त्यांना आज उपासमारी सहन करावी लागत आहे, याला एकच कारण झाले आहे की एसटी कामगारांचा पगार जो 7 तारखेपर्यंत होत होता तो आज पंधरा तारीख उलटली तरी पगार झालेला नाही. यामुळे आम्ही जगावं तरी कसे असा सवाल कामगार करीत आहेत. एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी ही बाब परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणलेली आहे. परंतु त्यांना यासाठी वेळ मिळत नसल्याचे समजते, राज्याचे परिवहन मंत्री एडवोकेट अनिल परब यांनी प्रशासनाला 600 कोटी रुपयांची भरघोस आर्थिक मदत मंजूर केली आहे. आता कामगारांचाही पगार लवकरात लवकर मिळावा अशी विनंती या कामगारांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.