ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांची जगण्यासाठी धडपड अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी केली आर्थिक मदत !!
ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांची जगण्यासाठी धडपड अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी केली आर्थिक मदत !!
नानामामा, गोलमाल, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, भिकारी, ही पोरगी कोणाची, वंटास यासारख्या मराठी चित्रपटात आणि नाटकात अव्वल भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांची परिस्थिती फार बिकट झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्याकडे कोणतेही काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच त्यांची गिरगाव येथील जुनी खोली ही विकसित होत आहे. त्यातच कौटुंबिक वाद असल्याने त्यांना बिल्डर कडून चेक मिळत नाही. त्यामुळे ते राहत असलेल्या भाड्याच्या घराचे भाडे कसे द्यायचे आणि उदरनिर्वाह कसा करायचा हा ज्वलंत प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. याबाबत त्यांची बातमी प्रसारमाध्यमामध्ये आल्यावर त्याची दखल अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी घेतली. त्यांनी माहिमकर यांना आपल्या बँकेच्या कार्यालयात बोलवून आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. तसेच त्यांना यापुढेही कोणतीही मदत लागल्यास निःसंकोचपणे सांगावे असे आवाहन केले. मला घनदाट यांनी त्यांच्या बँकेत बोलवुन मदत केल्याबद्दल मी खूप भारावून गेलो आहे. त्यांनी माझ्या बातमीची दखल घेऊन मला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. अशा मदतीमुळेच मी अजून जिवंत आहे.
मी 72 वर्षाचा असून मी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट मध्ये काम केले आहे. मी गेल्या 1 वर्षांपासून बिल्डरकडे माझ्या भाड्याच्या चेकसाठी वणवण भटकतो आहे. माझे जगणे फार कठीण झाले असून मी जगावे की मरावे अशी माझी भावना झाली आहे. मला अजून न्याय मिळाला नसून याबाबत मी गिरगाव येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले असून मला खात्री आहे की ते माझी समस्या सोडवून मला माझ्या घराच्या भाड्याच्या चेक मिळवून देतील अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी दिली. माहिमकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी चित्रपट महामंडळ, मराठी कलाकार संघटना लवकरच मदत करतील अशी त्यांना अपेक्षा आहे.
संपर्क:- ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर :- 8356807208 / 9869680272