भायखळ्यात भव्य कोविड लसीकरण मोहीम !!
सम्राट शेअर आणि केअर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ मयुरी शिंदे यांच्या वतीने मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत पोमण निवास, पहिली क्रोस लेन, कंजारवाडा, भायखळा पश्चिम, मुंबई येथे भव्य मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेत कोविशील्ड आणि कोव्यक्सीनचा पहिला आणि दुसरा डोस मोफत मिळणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक संतोष शिंदे यांनी केले आहे.