मुंबई पोलिसांची ऑपरेशन शोध ६ ची मोहीम सुरू !!
दिनांक २०/११/२०२६ ते ०३/१२/२०२६ या कालावधीत मुंबई शहरामध्ये राबविण्यात येणारी ऑपरेशन शोध ६ ही शोध मोहिम रेकॉर्डवरील अपनयन / अपहरण झालेल्या १८ वर्षाखालील मुले व मुली (बालके) व हरविलेल्या १८ वर्षावरील महिलांबाबतच्या ह्या विशेष शोध मोहिमे दरम्यान नागरिकांनी मदत करण्यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तालयाने विशेष आवाहन केले आहे.
मुंबई शहरामधील रेकॉर्डवरील अपनयन अपहरण झालेल्या १८ वर्षाखालील मुले व मुली (बालके) व हरविलेल्या १८ वर्षावरील महिलांबाबत विशेष शोध मोहिम करण्यासाठी दिनांक २०/११/२०२६ ते ०३/१२/२०२६ या कालावधीत मुंबई शहरामध्ये ऑपरेशन शोध-६ हया शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कालावधीमध्ये मुंबई शहरातुन १८ वर्षाखालील हरविलेलेली जास्तीत जास्त मुले व मुली व १८ वर्षावरील हरविलेल्या महिला सापडण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी मुंबई मधील नागरिकांनी पोलीस व हरविलेल्या/अपहरण/अपनयन संदर्भात काम करणाऱ्या विविध अशासकीय संस्था यांना मदत केल्यास जास्तीत जास्त हरविलेल्या/अपहरण झालेल्या बालकांचा, महिला/पुरूष यांचा शोध घेण्यास मदत होणार आहे. तरी मुंबईमधील सर्व नागरीकांना पोलिसांमार्फत विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आपल्या परिसरामध्ये संशयास्पद लहान मुले/मुली हरविलेले महिला आढळल्यास अगर त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास खालीलप्रमाणे माहिती संबंधीत विभागांना देवून सदरचा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी मुंबई पोलीसांना मदत करावी.
कोणताही संशयीत लहान मुले व मुली किंवा हरविलेले महिला मिळुन आल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी व काही संशयीत वाटल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास १०० अगर १०९८ या क्रमांकावर कळवावे किंवा लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा अगर सदर हरविलेले व्यक्ती/बालके यांना तात्काळ जवळच्या पोलीस ठाणेस घेवून जावे.
दि.२०/११/२०२६ ते ०३/१२/२०२६ या कालावधीत रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भिक मागणारी अथवा कचरा गोळा करणारी लहान मुले/मुली, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी लहान मुले/मुली मिळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास १०० या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
आपण रहात असलेल्या परिसरामध्ये लहान मुले/मुली काम करीत असल्याचे मिळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास १०० किंवा १०९८ या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर/बस स्थानका बाहेरील परिसर या ठिकाणी बेवारस स्थितीत लहान मुले/मुली किंवा महिला/पुरूष मिळुन असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास १०० किंवा १०९८ या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
आपल्या राहत्या परिसरात नातेवाईकांकडे राहणारी लहान मुले/मुली, महिला/पुरूष यांचेबाबत काही संशय असल्यास त्याबाबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास १०० किंवा १०९८ या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी संशयीत वाटल्यास त्याबाबत https://missionvatsalya.wcd.gov.in या बेवसाईटवर जावुन khoya paaya या पोर्टलवर मुला व मुलीचा फोटो अपलोड करावा.
आपल्या आजुबाजुच्या परिसरामध्ये कोणी लहान मुले घरकाम करताना मिळुन आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास १०० अगर १०९८ या क्रमांकावर कळवावे किंवा लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
पोलिसांच्या या समाजाला उपयुक्त असलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून सहकार्य करावे असे आवाहन बातमीकार तर्फे करण्यात येत आहे.