भारतीय चलनाच्या बनावट नोटांच्या विक्रीचा पर्दाफाश !!

भारतीय चलनाच्या बनावट नोटांच्या विक्रीचा पर्दाफाश !!

    भारतीय चलनाच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या इसमास मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.


       दिनांक ०६/०९/२०२६ रोजी गुन्हे शाखा कक्ष- २ मुंबई यांना गुप्त खात्रीलायक माहिती मिळाली कि, मेट्रो सिनेमा जवळ, वासुदेव बळवंत फडके चौक, मुंबई या ठिकाणी एक महिला व एक इसम भारतीय चलनाच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता भारतीय चलनाच्या खऱ्या नोटांचे एक लाख रूपये दिल्यास त्या बदल्यात बनावट नोटांचे दोन लाख रूपये मध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळाली.


       नमुद ठिकाणी कक्ष-२ कार्यालयाचे पोलीस पथक सापळा रचून थांबले असतांना सदर ठिकाणी एक महिला २७० बनावट नोटांसह मिळून आली, तीने ५००/- रूपये दराच्या बनावट नोटा एका इसमाकडून आणल्याचे सांगितले. 


        तांत्रिक तपासातुन सदरचा इसम कुर्ला स्टेशन जवळ सापडला व त्याच्या ताब्यात ५००/- दराच्या १८५८ बनावट नोटा देखील सापडल्या. अशाप्रकारे त्यांचे कडून ५००/- रूपये दराच्या एकुण २१२८ बनावट नोटा १०,६४,०००/- रूपयाच्या जवळ बाळगतांना  त्यांच्याविरुध्द आझाद मैदान पोलीस ठाणे येथे कलम १७८,१८०, ६१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पूढील तपास गुन्हे शाखा, कक्ष-२ मार्फत चालू आहे.


        सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण, श्री. दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-२ येथील प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप तेजनकर, पोलीस उप निरीक्षक श्री. संकल्प मोकल, पोलीस हवालदार राणे, पोलीस शिपाई सय्यद, महिला पोलीस शिपाई क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांनी केलेली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week