सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना गोव्यातून अटक !!

सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना गोव्यातून अटक !!

मोबाईल सिम कार्ड व विविध बँक खात्यांचा वापर करून ऑनलाईन सायबर फसवणुक करणाऱ्या ०७ आरोपींना गोवा येथून, मुंबई गुन्हे शाखेकडून अटक !!


     दिनांक ११/०९/२०२६ रोजी गुन्हे प्रकटीकरण कक्ष ५ शाखेने मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून सायबर फसवणूक करणा-या इसमांविरुध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कक्ष ५ मार्फत सुरू केलेला आहे. 


      सदर आरोपींनी इतर साथीदारांसह स्वतःच्या व इतरांच्या नावावर विविध बँकांमध्ये बँक खाती उघडून सदर बँक खात्यांशी लिंक करण्यासाठी स्वतःच्या व इतरांच्या नावावर विविध सिमकार्ड खरेदी करून घेतली. सदर बँक खाती उघडल्यानंतर त्यांची पासबुक, ATM कार्ड, चेकबुक, सिमकार्ड तसेच संबंधित बँक खात्यांशी निगडित इतर साधनांचा प्रत्यक्ष ताबा व नियंत्रण स्वतःकडे घेवून सदर खात्यांचा वापर हा सायबर फसवणूकसाठी करीत होते. त्यांचेकडून विविध बँकांची ८८ पासबुक, १४३ चेकबुक, १०० एटीएम कार्ड, २४ मोबाईल, १६७ सिमकार्ड, २ लॅपटॉप जप्त करण्यात आले होते.


     त्यानंतर गुन्हयाचे पुढील तपासामध्ये तांत्रिक विश्लेषन व मानवी कौशल्याचे आधारे वारका, राज्य-गोवा येथुन दि.१३/०९/२०२६ रोजी रिसॉर्ट मधील एका व्हिला मधून सायबर फसवणूक ऑपरेट करणा-या ०७ आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन विविध कंपनीचे ५९ मोबाईल फोन, वेगवेगळया कंपन्याचे एकून १९ सिमकार्ड, ०९ लॅपटॉप, ५१ एटीएम, १२ पासबुक व इतर साहीत्य हस्तगत करण्यात आले आहे.


      आरोपींनी आर्थीक फसवणूक रक्कम हस्तांतरीत करणेसाठी स्वतःचे सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन बनवुन त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.


     आरोपींना न्यायालयाने दिनांक २४/०९/२०२६ रोजीपर्यत पोलीस कोठडी व रिमांड मंजुर केली आहे.


      सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य) श्री. सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी पोतदार, पोलीस निरीक्षक धराडे, पोलीस निरीक्षक तेलतुंबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, सचिन बाराते, पोलीस उपनिरीक्षक इंगोले, नितीन पालांडे, अजय पोवार, महेश अंजनवाड, अंकुश न्यायनिगुर्णे, सहाय्यक फौजदार घाडगे, निरभवणे, पोलीस हवालदार तानाजी पाटील, मुलाणी, काळे, लोहकरे, बनसोडे, पोलीस शिपाई भाउसो पवार यांनी केली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे