जेवणासाठी पैसे मागितले म्हणून मानेवर वार केला !!

जेवणासाठी पैसे मागितले म्हणून मानेवर वार केला !!

मुंबईतील आग्रीपाडा परिसरात खुनाचा प्रयत्न !!


       दि.२४/११/२०२६ रोजी ०८.०० वा. च्या सुमारास फिर्यादी मो जमील मो सुलतान अन्सारी, वय-४० वर्षे, धंदा-मजुरी, राहणार भायखळा पश्चिम, मुंबई हे भायखळा पश्चिम रेल्वे स्टेशनसमोरील फुटपाथ, एन. एम. जोशी मार्ग येथे त्यांचा चुलत भाऊ आता अटकेत असलेला आरोपी पुरूष वय-४५ वर्षे याच्याकडे जेवणासाठी पैसे मागण्याकरीता गेले असता त्याचा आरोपी याला राग आला.


        त्यावर त्याने रागामध्ये फिर्यादीला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकुने सुलतान अन्सारी फिर्यादी यांचे मोनवर वार करुन जबर जखमी केले म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि.२५/११/२०२६ रोजी गु.र.क्र. ५९५/२६, कलम १०९(१), ३५२, बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे