मुंबईतील एंजल स्पाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित !!

मुंबईतील एंजल स्पाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित !!

मुंबईतील एंजल स्पाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित !!

     स्पा मधील रूमचे फुल हाईट चे बांधकाम परवाना किंवा अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) नसताना कामकाज चालवल्याचा आरोप, तसेच मसाज सेवांच्या नावाखाली अवैध कृत्ये होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याची मागणी.


       मुंबई : सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एंजल स्पा' (Angel Spa) बाबत गंभीर आरोप आणि प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, मसाज देण्याच्या नावाखाली या स्पा मधील महिलांना अनैतिक कृत्यांमध्ये गुंतवले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तथापी या आरोपांची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही आणि संबंधित विभागांकडून सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.


         स्पाच्या जाहिरातीमध्ये त्याचा पत्ता अजय मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, बी1/22, अंधेरी - कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी पूर्व, मुंबई, असा नमूद केला आहे. जाहिरातीत मसाज तसेच सर्व प्रकारच्या सेवांचा उल्लेख आहे.


   स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जागेत मुख्य प्रश्न असा आहे की, चालकाकडे वैध परवाना आणि आवश्यक त्या सर्व परवानग्या आहेत का ?


        स्पा मध्ये फुल हाईट केबिन बांधकामाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परवाने आणि अग्निशमन विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राबाबत (Fire NOC) प्रश्न विचारले जात आहेत.


       तसेच तेथे काम करणाऱ्या तरुणींकडे मसाज थेरपीचे प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र आहे की नाही, याची पडताळणी संबंधित विभागांनी करावी, अशी मागणीही केली जात आहे.


     मसाज सेंटर की आणखी काही? पोलीस तपासातून सत्य समोर येईलच.


        सर्वात गंभीर आरोप हे 'एंजल स्पा'मध्ये मसाज सेवांच्या नावाखाली कथितरीत्या चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित आहेत. तक्रारीत केलेले आरोप जर सिद्ध झाले, तर ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची बाब राहणार नाही; तर त्यातून महिलांची सुरक्षा, कामगारविषयक नियम, अग्निसुरक्षेचे निकष आणि स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण यांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होतील.


      आता सहार पोलीस, संबंधित बीएमसी (BMC) अधिकारी, अग्निशमन दल आणि इतर सक्षम प्राधिकरणांसमोर हा प्रश्न उभा राहतो की, एंजल स्पा'ची कागदपत्रे, परवाने, अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्र (Fire NOC), कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या कामकाजाची एकूणच कायदेशीर वैधता यांबाबत निष्पक्ष तपास केला जाईल का ?


      टीप: वरील अहवालात नमूद केलेल्या स्पाबाबतचे आरोप प्राप्त झालेली माहिती तक्रारींवर आधारित आहेत. या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात येईल. संबंधित आस्थापनेची बाजू उपलब्ध झाल्यास ती देखील प्रकाशित केली जाईल.



Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे