मुंबईतील बांगुर नगर पोलीस स्टेशनने कोकेन नावाचा रुपयांचा अमली पदार्थ केला जप्त !!
मुंबईतील बांगुर नगर पोलीस स्टेशनने कोकेन नावाचा रुपयांचा अमली पदार्थ केला जप्त !!
बांगुरनगर पोलीस ठाणे कडून एकूण २१,१३,४८,५००/- रूपये किंमतीचा ४२२६.९७ ग्रॅम "कोकेन" अंमली पदार्थ जप्त.
दि.०२/११/२०२६ रोजी रात्री ०८:०० वाजता बांगुरनगर लिंकरोड पोलीस ठाणेचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम) येथे गस्त करीत असताना शिवम सह. सोसायटी समोर, दक्षिण वाहिनी लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे रस्त्यालगत एक इसम नामे फुलचंद्र ईश्वरदयाल कश्यप, वय ३१ वर्षे, धंदा-नाही, सध्या मढ व्हिलेज मालाड (प) मुंबई येथे राहत असलेल्या, मुळचा राहणारा उत्तर प्रदेश हा संशयास्पद रित्या हालचाल करताना तेथे उभा असलेला दिसून आला. त्याचेकडे विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५.९७ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत २,९८,५००/- रुपये असा मुद्देमाल मिळून आलेने सदर मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला.
सदर आरोपीकडे अधिकचा अंमली पदार्थ असल्याचे संशयावरून त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, दिनांक ०३/११/२०२६ रोजी ०३.०२ वा त्याच्या मढ व्हिलेज मालाड (प), मुंबई येथील राहत्या घराच्या घरझडती दरम्यान एकूण ६७२ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत ३,३६,००,०००/- रुपये (तिन कोटी, छत्तीस लाख रूपये) राहत्या घरात मिळून आलेने सविस्तर घरझडती पंचनामा करून जप्त करण्यात आला. त्यावरून आरोपी फुलचंद विरोधात बांगुरनगर पोलीस ठाणे येथे नोंद क्र. १०३९/ २०२६, कलम ८ (क), २१ (क) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
त्याच्याकडे तपासादरम्यान सदरच्या जप्त अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार मुजाहिद अली. राहणार मध्य प्रदेश याचे सोबत मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने आरोपी मुजाहिद अली यास गुन्हयाच्या तपासात अटक केली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये आतापर्यंत २१,१३,४८,५००/- रूपये (२१ कोटी १३ लाख ४८ हजार ५०० रूपये) किंमतीचा एकूण ४२२६.९७ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
त्यानंतर सदरच्या दोन्ही आरोपींकडे जप्त कोकेन हा अंमली पदार्थ कोठून आणला व तो अंमली पदार्थ ते कोणास देणार होते याबाबत तसेच त्यांना याकामी आणखी कोणी मदत केली आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, माननीय सह पोलीस आयुक्त मुंबई (कायदा व सुव्यवस्था) श्री. मनोजकुमार शर्मा, माननीय अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई श्री. शशी कुमार मीना, माननीय पोलीस उप आयुक्त, उत्तर परिमंडळ १ मुंबई श्री पुरुषोत्तम कराड, माननीय सहायक पोलीस आयुक्त, ओशिवरा विभाग मुंबई श्री विनायक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगुरनगर पोलीस ठाणे मुंबई जयवंत पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोंडूभैरी, संदीपान उबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पडलवार, श्रीकांत कर्पे, पोलीस हवालदार संकपाळ, पोलीस शिपाई खेडकर, आवळकर, दळवी, गावित यांनी केली आहे.
जनतेला आवाहन :- अंमली पदार्थ विक्री, साठवणुक, वाहतुक, सेवन करणे हा अपराध असुन यामध्ये सहभागी असलेले इसमांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास बांगुरनगर लिंकरोड पोलीस ठाणे येथे द्यावी. माहिती देणारे इसमांची नावे गुप्त ठेवली जातील.