पत्रकारिता अबाधीत राहिली पाहिजे, मुंबई मराठी पत्रकार संघ !!

पत्रकारिता अबाधीत राहिली पाहिजे, मुंबई मराठी पत्रकार संघ !!

       अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. एम.डी.शेख, सेक्रेटरी श्री. अरुणकुमार मुंदडा, कार्यकारिणी सदस्य श्री. संदेश शहा व मुंबई प्रतिनिधी श्री. संजय धोत्रे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांची सदिच्छा भेट घेतली असता वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले.

       राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर या भेटीत चर्चा झाली. राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा व लोकल प्रवासाची मुभा मिळावी म्हणून पत्रकार संघाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याबद्दल परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संघाची विशेष प्रशंसा केली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week