
लोकांनी लोकवर्गणीतून बांधला बंधारा !!
कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडून सुद्धा कोकणातील बऱ्याच गावांना उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागतं आणि यात प्रत्येक घरातील बिचाऱ्या आया-बहीणींचे जास्तीत जास्त हाल होतात. कोकणातील अनेक गावांत तीन महिने पाणी हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरतो. काही ठिकाणी जीवन मरणाचा प्रश्न ठरतो.
चाटव गावाची सुद्धा काही अशीच परिस्थिती होती अनेक वर्षांपासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत सुंदर अस चाटव नावाचं गाव आहे. पण आत्ता हे चित्र बदललं आहे. गाव आता 'समृद्ध चाटव गाव' म्हणून पंचक्रोशीत ओळखलं जात आहे. याचे कारण म्हणजे गावाजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीला वेळेत कच्चा पाठबंधारा बांधून गावकऱ्यांनी व मुंबई मंडळातील चाकरमान्यांनी एकत्र येऊन एकोप्याने, हे गावासमोर असलेलं अनेक वर्षापासूनच मोठं संकट अगदी सहज लीलया सोडवलं आहे.
ह्या गावासारखी अशी बरिच गावं सगळ्या कोकणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे पाण्याची खुप टंचाई आहे. पण सर्वात प्रथम गावचं भलं, गावाचा विकास प्रथम असं जर सर्वांनी मिळून ठरवले तर हे सहज शक्य आहे हे आज पाहायला मिळत आहे.