नवरात्रोत्सव आणि पैठणी !!

नवरात्रोत्सव आणि पैठणी !!

     नवरात्र मोठ्या उत्साहाने आणि नऊ रंगाने, आनंदाने सुरू होत आहे. नऊ दिवस तरुण तरुणी, गरबा दांडियाचा फेर धरून एका तालात खेळतात. आता सर्व सणांचे मार्केटिंग, इव्हेंट झाले असल्यामुळे गरबा, दांडिया साठी प्रवेशिका देण्यात येते. त्या मध्ये डीजेचा आवाज, सेलिब्रिटींचा सहभाग असतो.


    शास्त्रामध्ये दुर्गा देवी उपासनेसाठी नऊ रंगाच्या साड्या परिधान करा असे लिहिले नाही. धुतलेले स्वच्छ, वस्त्र परिधान करून देवीची आराधना, पूजा करता येते. देवीच्या मूर्तीचे सकाळ आणि संध्याकाळ पैठणी साडी परिधान करण्याची प्रथा आहे. आता काही उत्सव मंडळाने सिंह, वाघावर बसलेल्या मूर्ती ऐवजी उभी मूर्ती स्थापन करून दररोज भक्तांनी अर्पण केलेल्या पैठणी साड्या बदलल्या जातात.


       देवीने परिधान केलेली पैठणी साडी आहे म्हणुन लिलावात जास्त किम्मत येते. अशी धंदेवाईक वृत्ती सुरू झाली आहे. तरी उत्सवाचे पावित्र्य राखायला हवे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week