बेस्ट मध्ये असलेल्या मान्यताप्राप्त युनियनच्या बी.आर.आई कायदा रद्द झाल्यामुळे मान्यता गेल्या !

बेस्ट मध्ये असलेल्या मान्यताप्राप्त युनियनच्या बी.आर.आई कायदा रद्द झाल्यामुळे मान्यता गेल्या !

         बेस्ट मध्ये असलेल्या मान्यताप्राप्त युनियनच्या बी.आर.आई कायदा रद्द झाल्यामुळे मान्यता गेल्या आणि सर्व युनियन समान पातळीवर आल्या आणि बेस्टमध्ये आय.डी. ऍक्ट कायदा लागू झाला आणि त्याचा फायदा घेत बेस्टमधील शिवसेना प्रणित असलेली बेस्ट कामगार सेनेने गेल्या ५० वर्षांनंतर बेस्टमध्ये ऐतिहासिक करार केला आणि बेस्टमधील सर्व कामगार वर्गास भरगोस पगारवाढ करून दिली आता बेस्टमध्ये  कामगार वर्गाची युनियची सभासद नोंदणी चालू झाली आहे, त्यामध्ये सर्व युनियन आता मोठया प्रमाणात सदस्य नोंदणी अभियानात उतरल्या असून सर्व ठिकाणी बेस्ट कामगार सेनेची सभासद नोंदणी कामगार मोठया प्रमाणात करतांना दिसत आहेत आणि सदर नोंदणीचे पडसाद काल बेस्ट समिती मध्ये पण दिसले, भाजपा चे बेस्ट समिती सदस्य श्री गणेश हडकर व श्री सुनील गणाचार्य ह्यानी सदर सभासद नोंदणीला विरोध केला, त्याला उत्तर म्हणून जेष्ठ बेस्ट समिती सदस्य बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत ह्यांनी सांगितले की आता बेस्ट मध्ये शिवसेनेची सभासद नोंदणी जर जास्त झाली तर बेस्ट कामगार सेनेला मान्यता मिळणार म्हणून भाजपा वाले बेस्ट वर्कर्स युनियची बाजू बेस्ट समिती मध्ये मांडत आहेत.

      तसेच बेस्टमधील विद्युत पुरवठा विभागांत असलेली मुबंई इलेक्ट्रीक वर्कस युनियनचेही सभासद मोठ्या संख्येने बेस्ट कामगार सेनेत प्रवेश करत आहेत त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन व मुबंई इलेक्ट्रीक वर्कस युनियनच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. असे बेस्ट कामगार सेनेचे कार्यकारणी सदस्य गणेश शिंदे यांनी सांगितले.


Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे

Most Popular News of this Week