रंगेल मिया , को पहनाया हतकडी का जोडा!!!!!
पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार करून, तिचा निर्घुण खून केलेल्या रंगेल आरोपीस वसई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!!!! कक्ष दोन गुन्हे शाखेची कामगिरी...
आज तागायत पाहता लहान कोवळ्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या लिंग पिपासूचेप्रमाण काही कमी होत चाललेले नाही, त्यामुळे कधी कधी गरीब आईला मुलगी नकोशी वाटते. जोपर्यंत मुलगी घरी येत नाही तोपर्यंत तिचे आई-वडील काळजीत असतात. कारण वाढत चाललेला लिंग पिपासुपणा त्यातल्या त्यात लहान कोवळ्या मुलींवर होत चाललेले लैंगिक अत्याचार या गोष्टी काळजाचं पाणी करणाऱ्या आहेत. तसेच समाजासाठी शर्मनाक आहेत. विकृत मनोवृत्ती असलेले पुरुष आणि त्यांच्या हातून होणारे लहान मुलींवरचे अत्याचार, अशा बातम्या वारंवार आपण वाचत असतो. पण काही वर्षानंतर काही गुन्ह्याचे निकाल लागतात, तर काही त्या घटना विसरून जातात. परंतु महाराष्ट्र पोलीस अतिशय चोखपणे आपली कामगिरी बजावत आलेले आहेत आणि अशाच लिंग पीपासू विकृत मनोवृत्ती असलेल्या युगल पुरुषांना पकडून शिक्षाही ठोठावली जात आहे. अशीच एक घटना वसई येथे घडली.
काही वर्षांपूर्वी म्हणजे २००७ साली अशाच एका विकृत मनोवृत्ती असलेल्या लैंगिक पिपासूने एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून, तिचा निर्घुण खून केला होता.
दिनांक ३१/३/०७ ते १/४/०७ रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी बाबुलाल जगईप्रसाद गौतम वय वर्ष १९ राहणार यादव कंपाउंड, अवधराम यादव चाळ, सातिवली, तालुका वसई. याने तक्रार नोंदवली की; दिनांक ३१/१/०७ ते १/४/०७ रोजी सकाळी ८ च्या सुमारास गुन्ह्यातील आरोपी नंदलाल उर्फ नंदू रामदास विश्वकर्मा वय वर्ष २२, राहणार सातिवली, तालुका वसई, मुळ गाव खरदौरी, तालुका ईटावा, जिल्हा सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश. याने फिर्यादीची मुलगी वय वर्ष ५ हिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आरोपीने आपली लैंगिक हवस पूर्ण करण्यासाठी एक पाच वर्षीय बालीकेवर जबरी संभोग करून कोणत्यातरी साधनाने मारहाण करून तिच्या डाव्या गालावर, तसेच तिच्या नाकावर जखमा करून तिचा गळा आवळून तिला जीवे ठार मारले.
त्याबाबत दिनांक १/४/०७ रोजी भारतीय दंड विधान कलम ३०२,३६३,३७६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांनी गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. म्हणून गुन्ह्याची नव्याने तपासणी करून वरील गुन्ह्याचा तपास सुरू झाला.
वरील गुन्हा करून फरार झालेला आरोपी त्याच्या मूळ गाव उत्तर प्रदेश येथे लपत छपत फिरत असल्याची खात्रीलायक गुप्त बातमी सहाय्यक फौजदार रवींद्र पवार यांच्या गुप्त बातमीदाराकडून प्राप्त झाली.
सदर आरोपीची कौशल्यपूर्ण तपासाद्वारे प्राप्त झालेली माहिती, त्या अनुषंगाने आरोपी यास त्याचे मूळ गाव खरदौरी तालुका ईटावा जिल्हा सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश येथे तपास पथक रवाना करून आरोपीस दिनांक १०/१२/२०२५ रोजी अटक करण्यास गुन्हे प्रकटीकरण कक्ष दोन वसई यांना यश प्राप्त झाले.
वरील गुन्ह्याची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त माननीय श्री.निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे, डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन वसई चे पोलीस निरीक्षक श्री अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष घाडगे, सहाय्यक फौजदार अजित गिते, सहाय्यक फौजदार संजय नवले, मुकेश पवार, मनोज मोरे, रवींद्र पवार, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल पाटील, प्रशांतकुमार ठाकूर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, रवींद्र कर्पे, दिलदार शेख,
पोलीस अंमलदार अनिल साबळे अक्षय बांगर महाराष्ट्र सुरक्षा बल रामेश्वर केकान, सर्व नेम. गुन्हे शाखा कक्ष ०२ वसई, तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, नेम. सायबर पोलीस ठाणे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.