
बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांना बढती !
बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांना बढती !
बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे आणि बेस्ट प्रशासनाच्या सहकार्याने सर्वच कर्मचारी वर्गाला सेवेमध्ये बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर बढती देण्यात येते, त्याप्रमाणे विद्युत पुरवठा बाह्य अ आणि ब विभागांतील मिटर वाचक कर्मचारी वर्गाला देखील सेवेमध्ये बारा वर्षे पूर्ण झाली व त्यांना पर्यवेक्षक (वै) हे पद देऊन बढती देण्यात आली.
त्याबद्दल सदर कर्मचारी वर्गाने एक सामाजिक भान या उद्देशाने बेस्ट समिती अध्यक्ष श्री. प्रवीण शिंदे ह्यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी रुपये ५०००/- ईतका चेक सुपूर्द केला. त्यांच्यासोबत बेस्ट समिती सदस्य श्री. सुहास सामंत, श्री. आशिष चेंबूरकर, श्री. सुनील गणाचर्य, श्री. प्रकाश गंगाधरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. अनिल सिंगल, विभागीय अभियंता श्री. बनसोडे, बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री. गणेश शिंदे, तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.