
बेस्ट कामगार सेनेचा विजयी मेळावा !
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उध्दव ठाकरे, आदित्यजी ठाकरे पर्यावरण मंत्री, उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नाने बेस्ट मधील नैमित्तिक कामगारांना कायम कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक ०२/०२/२०२१ रोजी शिवसेना भवन येथे सायंकाळी ०५ वाजता विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम शिवसेना नेते उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई, शिवसेना नेते बेस्ट समिती सदस्य बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत, बेस्ट समिती अध्यक्ष श्री प्रवीण शिंदे, बेस्ट समिती सदस्य श्री अनिल कोकीळ, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस श्री रंजन चौधरी, कार्याध्यक्ष ऍड श्री उदय आंबोनकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.