नितळ मनाची माणसं कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न...

नितळ मनाची माणसं कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न...

     प्रतिनिधी - जगदीप वनशिव पुणे येथील दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रमुख सीताराम मारुती सोनवणे उर्फ दादासाहेब सोनवणे यांच्या जीवन प्रवासावर आधारित चरित्रात्मक कादंबरीच्या लेखिका सुभा लोंढे लिखित नितळ मनाची माणसं या कांदबरीचे प्रकाशन  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भारत सासणे (माजी संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय मराठी संमेलन साहित्य संमेलन) या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दलित स्वयंसेवक संघाचे राज्य प्रवक्ते सुजित रणदिवे यांनी केले.

     अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले एखाद्या व्यक्तीचे चरित्र लिहिणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड साधना आणि कठोर मेहनत करावी लागते. केवळ कल्पना करून लिहिले, तर त्यातून दिशा आणि बोध मिळत नाही. त्यामुळे वास्तविकतेला कल्पनेची जोड देऊन लिहावे लागते. चांगला लेखक सर्वोर्थाने विचार करून लिहितो. त्यामुळे त्याचे लेखन वाचनीय ठरते. याची प्रचिती प्रसिद्ध लेखिका सुभा लोंढे यांच्या नितळ मनाची माणसं या चरित्रात्मक कादंबरीच्या पानोपानी येते. त्यातील घटना, प्रसंग, किस्से आणि मांडणी कोणत्याही वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. त्यामुळे नितळ मनाची माणसं ही केवळ कादंबरी नव्हे, तर दलित चळवळीचा इतिहास आहे, असे परखड भाष्य ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.

     कार्यक्रमाचे प्रस्ताविक दलित स्वयंसेवक संघाचे राज्य प्रवक्ते सुजित रणदिवे यांनी केले. यावेळी शौर्य अकॅडमीचे संचालक हरिदास भिसे, प्रथमेश शिक्षण संस्थेचे प्रमुख ज्ञानेश्वर कांबळे, अमोल लोंढे, चंद्रकांत नारायणे, तात्या सोनवणे, लेखक बाळ भारस्कर, मधुकर थोरवे, जनार्दन वाघमारे, अनंत भिसे, स्वाती राहुल उल्हारे, अनुराधा शैलेंद्र पाखरे, अश्विनी किशोर लांडगे, लाल सलाम काका,राम लोंढे, प्रभाकर वैराळ, भीमाताई रामचंद्र सोनवणे, उर्मिला पवार, संजय केंजळे व संतोष माने यांच्यासह सामाजिक चळवळीतले प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित होते.

      कादंबरीचे प्रकाशन करताना ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे म्हणाले जीवन हे एका कादंबरी सामावू शकत नाही तर त्याच्यावर खंड लिहावा लागेल दादा साहेबांचा व्यक्तिमत्व हे चिखलातील कमळ आहे. ही कादंबरी सर्वांनी अवश्य वाचावी असे जाहीर आवाहन करण्यात केले.

      दादासाहेब सोनवणे म्हणाले चळवळ मला श्वास आहे मी स्वतः शून्य आहे फक्त दलित स्वयंसेवक संघामुळे माझी ओळख आहे कार्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि प्रेरणादायी आहे तो समाजापुढे आला पाहिजे या भावनेतून ही कादंबरी लिहिली आहे असे त्यांनी सांगितले.


     या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन धनंजय झोंबाडे यांनी केले आभार सोपान चव्हाण यांनी मानले.

       नितळ मनाची माणसे या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पुणे येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन सभागृहात संपन्न झाला.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week