विरार पोलिसांचा गावठी हातभट्टी वर छापा !!

विरार पोलिसांचा गावठी हातभट्टी वर छापा !!

    प्रतिनिधी - (प्रीती तिवारी)  दिनांक १२ नोव्हेंबर रोजी गोपनीय बातमीदारांकडून गुन्हे प्रकटीकरण शाखा चार यांना माहिती मिळाली की, विरार पूर्व बरफ पाडा, लहानगेपाडा, समाज मंदिर जवळील शेतात बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची दारू तयार होत आहे. सदर गोपनीय बातमीवरून विरार पूर्व बरफपाडा, लहानगेपाडा, समाज मंदिराजवळील शेतात छापा घालून करण्यात आलेल्या कारवाई मध्ये एक लाख ५३हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यात तीन हजार लिटर नवसागर गुळ मिश्रित रसायन २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू व गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची साधने मिळून आली असून महिला आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार संदीप लक्ष्मण शेरमाळे गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष चार यांनी सरकारतर्फे विरार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून सदर बाबत विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१२ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ब )(इ)(ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


       सदरची कामगिरी माननीय श्री निकेत कौशिक पोलिस आयुक्त, माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, माननीय श्री संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमिरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सहाय्यक फौजदार संतोष मदने, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, पोलीस हवालदार धनंजय चौधरी, पोलीस हवालदार संदीप शेरमाळ, महिला पोलीस हवालदार सुप्रिया टिवले, सर्व नेम गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week