
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ प्रतीक्षा नगर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांची जयंती साजरी !
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ प्रतीक्षा नगर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांची जयंती साजरी !
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने सदर जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी करायची असे परिपत्रक काढले व त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सरकारच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रतीक्षा नगर येथील कार्यालयात आज नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले, त्यावेळी शिवसेना विभागप्रमुख नगरसेवक श्री मंगेश सातमकर, प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक श्री रामदास कांबळे, समन्वयक श्री रवी मुळीक, शाखाप्रमुख श्री संजय म्हात्रे, श्री संजय कदम, बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष उपशाखाप्रमुख श्री गणेश शिंदे, शाखाधिकारी श्री निलेश भोसले, चिटणीस श्री सिद्धेश कवटकर, श्री दशरथ पवार, श्री काशिनाथ संमग, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ प्रतीक्षा नगर कार्यालयांच्या संचालिका सौ खेडेकर मॅडम उपस्थित होत्या.