दि बेस्ट एम्प्लॉइस क्रेडिट सोसायटी, बेस्ट मधील जवळपास 35 हजार कामगार असलेल्या पतपेढीचे ऐतिहासिक पाऊल !

दि बेस्ट एम्प्लॉइस क्रेडिट सोसायटी, बेस्ट मधील जवळपास 35 हजार कामगार असलेल्या पतपेढीचे ऐतिहासिक पाऊल !

       सन 2016 मध्ये दि बेस्ट एम्प्लॉइस क्रेडिट सोसायटी मध्ये पतपेढीच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यामध्ये शिवसेना प्रणित उत्कर्ष पॅनेल उभे होते आणि त्यांनी त्यांच्या वचनाम्यात बेस्टच्या सभासद वर्गासाठी विविध योजना आश्वासने दिली होती, त्याचीच वचनपूर्ती म्हणून बेस्टच्या सभासद व त्यांच्या कुटूंबियांना एक क्षणभर विश्राती म्हणून अगदी कमी दरात विसावा मिळावा अथवा पिकनिक म्हणून त्यांच्या कुटूंबियांना आनंद घेण्यात यावा म्हणून लोणावळा येथील मावळ गावात सहा बंगले घेण्यात आले आहेत आणि त्याचे उद्घाटन शनिवार दिनांक ०३/०७/२१ रोजी शिवसेना उपनेते, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष, बेस्ट समिती सदस्य श्री सुहास सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अगदी मोजक्या लोकांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमला पटपेढीचे अध्यक्ष श्री. कीर्तन कोरी, सचिव श्री. उमेश सारंग व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.


        बंगल्याची संपूर्ण जबाबदारी ही दि बेस्ट एम्प्लॉइस को. ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी च्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे ज्या कामगार वर्गास बुकिंग करायचे असेल तर त्यांनी सोसायटी च्या कार्यालयात संपर्क साधावा अशी माहिती सचिव श्री. उमेश सारंग ह्यानी दिली आहे.


Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे

Most Popular News of this Week