
हौशी शरीर सौष्ठव सेवा संस्था !!
हौशी शरीर सौष्ठव सेवा संस्थेची कार्यकारिणी सभा रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता प्रेरणा जिमको, गावदेवी मैदान, घाटले गाव, चेंबूर येथे आयोजित करण्यात आली होती सदर मिटिंग मध्ये सन २०२१-२०२५ ची नवीन कार्यकारणी सर्व सभासद वर्गाच्या सहमतीने बनविण्यात आली.
अध्यक्ष-श्री अरुण दरेकर, उपाध्यक्ष-श्री श्रीकांत परब,श्री विजय काटदरे, सचिव-श्री हेमंत पाटील,सह सचिव-श्री शंकर कर्णिकर, खजिनदार-श्री जयप्रकाश पाटील, समिती सभासद-श्री आनंद तोरस्कर, श्री प्रफुल्ल जाधव, श्री गणेश शिंदे, श्री सुहास मोहिते, श्री अमर मेढेकर, श्री निखिल जाधव, श्री गणेश निकम, श्री अंकुश तेरवनकर, श्री किरण भंडारे.
नवीन कार्यकारिणीचे पुढील धोरण
१)व्यायामपट्टू तयार करणे,
२) बॉडी बिल्डिंग स्पर्धा भरवणे,
३)सर्व व्यायामशाळेत योग्य मार्गदर्शन करून मुलांना प्रोत्साहन देणे,
३) व्यायाम करणारे व व्यायामशाळा चालवणारे ह्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकार दरबारी मांडून प्रश्न सोडवणे.