श्रावणसांज काव्यमैफिल अध्यक्षपदी माणदेश कवी डॉ. लक्ष्मण हेंबाडे यांची निवड..

श्रावणसांज काव्यमैफिल अध्यक्षपदी माणदेश कवी डॉ. लक्ष्मण हेंबाडे यांची निवड..

     प्रतिनिधी -जगदीप वनसिव मंगळवेढा येथील माणदेश कविवर्य डॉ. लक्ष्मण हेंबाडे यांची श्रावणसांज काव्य मैफिल अध्यक्षपदी निवड करण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर अध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली.

       डॉ. लक्ष्मण हेंबाडे लिखित पांदवाट हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला काव्यसंग्रह वाचून ग्रामीण भागातील अस्सल मराठी बाज आहे त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगरचे अध्यक्ष संतोष गाढवे आणि संस्थेतील संचालक मंडळांनी एकमताने माणदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे यांची निवड केली आहे.

       श्रावणसांज काव्य मैफिल पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. प्रा. संदीप सांगळे (अध्यक्ष - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ) अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून लोककवी सिताराम नरके (राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी ) तसेच प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी देवा झिंजाड या राज्यस्तरीय श्रावणसांज काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रानकवी जगदीप वनशिव हे सूत्रसंचालन करणार आहेत.

      महाराष्ट्र राज्यातून 110 कवींनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. बहारदार दमदार श्रावणसांज काव्य मैफिल ही औद्योगिक शहरातील चाकण येथे संपन्न होणार आहे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून काव्य मैफिलची शोभा वाढवणार आहेत, असे जाहीर आव्हान कवी संतोष गाढवे यांनी केले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week