
आमदार श्री सुनील शिंदे यांच्या हस्ते गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू-प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला गौरव !!
आमदार श्री सुनील शिंदे यांच्या हस्ते गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू-प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला गौरव !!
दि बेस्ट एम्प्लॉईस को-ऑप क्रेडिट सोसायटी ली. या पतसंस्थेमार्फत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सभासदांच्या विविध शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा सत्कार येतो. शुक्रवार दिनांक १७/१२/२१ रोजी दामोदर हॉल परळ या ठिकाणी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्री सुनील शिंदे आमदार सदस्य विधान परिषद यांच्या हस्ते गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू-प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला तद प्रसंगी शिवसेना उपनेते, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत, बेस्ट समिती अध्यक्ष श्री आशिष चेंबूरकर, विभागप्रमुख, नगरसेवक श्री मंगेश सातमकर, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री रामदास कांबळे, संस्थेचे अध्यक्ष श्री कीर्तन कोरी इत्यादी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.
सदर प्रसंगी मराठी कलाकार श्री दिगंबर नाईक, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्री अमीर हडकर संयोजित धुमधडाका हा नामवंत कलाकारांचा मनोरंजन कार्यक्रम पार पडला, या बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री उमेश सारंग यांनी केले, सूत्र संचालन श्री संदेश नाईक यांनी केले.
सदर कार्यक्रमात सभासदांच्या पाल्यांमध्ये डॉक्टर, सी.ए.,इंजिनिअर, पदवीधारक, दहावी, बारावीतील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना बक्षिसे-प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. तसेच बेस्ट मधील कर्मचारी श्री भूषण गोसावी ह्यांची कन्या कु. गौरी भूषण गोसावी- सा रे ग मा पा लिटिल चॅम्पियन-२०२१ हीचा देखील सत्कार करण्यात आला.