कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना केली मदत !!

कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना केली मदत !!

      भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस, कामगार नेते यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस जल्लोषात साजरा लोअर परळ येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. शिंदे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा  देण्यासाठी विभागातील अनेक मान्यवर मंडळी, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी एकच गर्दी केली होती. याप्रसंगी शिंदे यांनी गिरगाव येथे राहणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते मनमोहन माहिमकर यांना वाढदिवसाचे औचित्य साधून आर्थिक मदत दिली.  अभिनेते मनोमहन माहिमकर यांची परिस्थिती फार कठीण झाले असून त्यांचा उदरनिर्वाह करणे फार जिकिरीचे झाले आहे अशा प्रकारच्या अनेक बातम्या वृत्तपत्रातून वाचल्या होत्या. ही माहिती कळताच शिंदे यांनी त्यांना आर्थिक मदत म्हणून फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी त्यांना आपल्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून आर्थिक मदत देऊन त्यांनी केलेल्या अभिनयाबाबत सत्कार केला.


       आम्ही समाजात विविध प्रकारचे सामाजिक, विधायक आणि शैक्षणिक कार्य करत असतो. कोरोना काळात देखील आम्ही गरीब आणि गरजू नागरिकाने मोफत अन्नधान्याचे वाटप केले आहे. माहिमकर यांच्याबद्धल अनेक बातम्या वृत्तपत्रातून वाचल्या होत्या त्यांना मदत करायचा संकल्प मी केला होता. आज मी माझ्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना मदत करायची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो अशी माहिती कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी या प्रसंगी दिली. या समारंभात निशिकांत शिंदे यांच्या सोबत त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week