साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक २०२२ !!

साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक २०२२ !!

      यंदा चे वर्ष ७ वे शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त साहेब फाउंडेशन चे अध्यक्ष व शिवसेना शाखा क्र १९६ चे उपशाखाप्रमुख श्री सतीश इनरकर यांच्या वतीने ओव्हर आर्म क्रिकेट सामने दिनांक १३/२/२०२२ रविवारी रोजी जांबोरी मैदान येथे खेळवण्यात आले. वरळीतील २४ नामवंत संघांनी भाग घेतला त्यात विजयी संघ मातृभूमी बी डी डी चाळ क्र ११३,११४ व उपविजेता जय संतोषी माता बी डी डी चाळ १२१ झाले.

     सदर कार्यक्रमा मध्ये साहेब फाउंडेशन चे अध्यक्ष व उपशाखाप्रमुख श्री सतीश सुदाम इनरकर, विभागप्रमुख बेस्ट समिती अध्यक्ष श्री आशिष चेंबूरकर, शाखा प्रमुख श्री जीवबा केसरकर, युवती अधिकारी कु रुपाली लष्करे, श्री सचिन साळवे, शाखा समनवयक व बाल विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week