वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून दाखवणार उत्तम सांडव !

वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून दाखवणार उत्तम सांडव !

 एकीकडे महाराष्ट्र राज्यात शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस यांची सत्ता असताना,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतलेली जाणवत आहे त्यात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव  कॅबिनेट मंत्री वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत ते मोठ्या मतांनी विधानसभेला निवडूनही आले, वरळी म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

राज ठाकरेंचे निष्ठावान मानले जाणारे वरळी  विभाागचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव उत्तम सांडव यांनी रुपेरी वरळीच्या प्रतिनिधींशी बोलताना निवडणुकीला बराच वेळ बाकी असताना देखील येत्या पुढील काळात मनसेला चांगले दिवस येणार या आधारावर आम्हीच वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून दाखवणार असा ठाम विश्वास व्यक्त करून दाखवला, व काही मनसे कार्यकर्त्यांनी वेळीच बदल घडला पाहिजे असा दुजोरा दिला.

  मागील मुंबई महानगरपालिका लोअरपरळ वोर्ड क्र. 191 मधून उत्तम सांडव यांच्या पत्नी सौ. उत्तरा उत्तम सांडव यांनी मनसेतून निवडणूक लढवली होती, तर उत्तम सांडव यांनी लोअरपरळ विभागात नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक असल्याचे सांगितले. 

वरळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहिर हे इथून आमदार होते. अहिर यांनी पक्ष बदलला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा नव्या जोमानं लढवण्याच्या प्रयत्नात आहे.

वरळीमध्ये उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, कामगार वर्ग मोठया संख्येने आहे. इथे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्नही प्रलंबित आहे

2014 च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले.

वरळी विधानसभा निवडणूक 2014 निकाल

सुनील शिंदे, शिवसेना - 60 हजार 625

सचिन अहीर, राष्ट्रवादी - 37 हजार 613

हा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

1962 – माधव नारायण बिरजे (काँग्रेस)

1967 – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

1972 – शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1978 - प्रल्हाद कृष्णा कुरणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी)

1980 - शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1985 - विनिता दत्ता सामंत (अपक्ष)

1990, 1995, 1999, 2004 - दत्ताजी नलावडे (शिवसेना)

मतदारसंघ पुनर्रचना

2009 – सचिन अहिर (राष्ट्रवादी काँग्रेस)

2014 – सुनील शिंदे ( शिवसेना).



Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week