
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या वतीने, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ !!
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या वतीने, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ !!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मुंबई वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या वतीने, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, दिनांक 26 जुलै रोजी वरळी जांबोरि मैदान येथील अंबामाता मंदिर हॉल मध्ये पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन शाखा क्रमांक 195 चे शाखाप्रमुख श्री. विजय भणगे, महिला शाखा संघटक श्रीमती सुजाता सावंत, शाखा समन्वयक श्री. किरण गावडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यानी केले होते. याप्रसंगी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य शिवसेना उपनेते व प्रवक्ते श्री. सचिन अहिर, माजी महापौर व महिला विभाग संघटक सौ. किशोरी पेडणेकर, विभाग प्रमुख व बेस्ट समिती अध्यक्ष श्री. आशिष चेंबूरकर, विधान परिषद आमदार श्री सुनील शिंदे, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास चे माजी विश्वस्त श्री. मोहन म्हामुणकर, माजी शाखाप्रमुख श्री दिलीप कदम, माजी म्हाडा सदस्य श्री. दिलीप राऊत यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, इमारत प्रमुख, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक उपस्थित होते.
(सौजन्य :- बिपीन दरडे)