
वरळीतील किन्नरांना मिळणार मतदानाचा अधिकार !!
राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्याचे अभियान सुरू केले आहे.
१८२ वरळी विधानसभा मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते- साई रामपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवशक्ती फाउंडेशन यांनी १८२-वरळी विधानसभा कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन, मतदार नोंदणीत नावे नसलेल्या किन्नर, अपंग व अंधाचा पन्नास नागरिकांचा शोध घेतला. त्यांना १८२ वरळी विधानसभा संघाचे नोंदणी अभियान मतदार अधिकारी डॉ. शिवाजी पाटील व वरळी विधानसभा संघाचे निवडणूक अधिकारी- महारुद्र वारे यांच्या हस्ते मतदार नोंदणी फॉर्म देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते साई रामपूरकर व शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष - विकी शिंदे व पदाधिकारी- कार्यकर्ते यांचे हे कार्य कौतुकास्पद असून वरळीतील किन्नरांना प्रथमच मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे.