मराठी चित्रपट "लाव" चा गाणे रेकॉर्ड करुन महूर्त !
चित्रपटात दिसणार नामवंत कलाकार.
नारीसहारा बहु उद्देशीय सामाजिक संस्था व व्ही.आ.के.फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मराठी चित्रपट "लाव" ह्या चित्रपटाचे गाणे रेकाॅर्डींग करुन चित्रपटाचा नुकताच मुहुर्त संपन्न झाला.
चित्रपटाची कथा एका प्रेम कहाणीच्या भोवताली असून चित्रपटामध्ये मुलींच शिक्षण का होत नाही, त्यांच्यामध्ये असलेला शिक्षणाचा भाव, बाल विवाह, बाल माता ह्या गंभीर विषयांवर हा सिनेमा भाष्य करणारा आहे. 'लाव' ह्या मराठी चित्रपटात अभिनेत्री सुहानी निंबाळकर यांनी प्रथमच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तसेच चित्रपटामध्ये अभिनेता तन्मय सांडवे सह सुप्रसिद्ध अभिनेता मिलींद शिंदे, अनिल नगरकर आणि अभिनेत्री विना जामकर महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत, सोबतच बाल कलाकार क्षितीजा भालेराव हा चमकणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल राजकुमार कांबळे करत असून लेखन श्रीकांत शिंदे ह्यांचे आहे. चित्रपटाला संगीत मिलिंद मोरे ह्यांचे असून गायक शिध्दार्थ जाधव, गितकार सुबोध पवार, आकाश पवार, नृत्य दिग्दर्शक राजेश पडवळे, सिनेमॅटोग्राफर गणेश पवार आणि कार्यकारी निर्माता पोपट जी.कांबळे ही संपूर्ण टीम जबाबदारी पार पाडणार आहेत.
मुहूर्ता वेळी आक्का भालेराव कांबळे, नारीसहारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा-वैशाली पवार, संतोष पवार सचिव - योगेश विधाते त्यांचे महिला सहकारी, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच व्ही.आर.के.फिल्म प्रोडक्शनचे राजकुमार कांबळे, संजय मोहीते, संग्राम सरवदे उपस्थित होते.
चित्रपटाचा मुहूर्त झाला असून लवकरच चित्रपटाच्या शुटींगला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व निफाड तालुक्यात सुरवात होणार आहे.