
संकल्प गोरेगाव मध्ये गणेश माघी जयंती व भव्य गणेश यज्ञ !
संकल्प गोरेगाव मध्ये गणेश माघी जयंती व भव्य गणेश यज्ञ !
मुंबई : संकल्प सहनिवास फेडरल को.ऑप. सोसायटी अंतर्गत, संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ, संकल्प महिला मंडळ व संकल्प ग्रुप आयोजित "माघी श्री गणेश जयंती उत्सव" संकल्प सोसायटी, गोरेगाव (पूर्व), येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.
माघी श्री गणेश जयंती उत्सवाचे हे १०वे वर्ष होते. संकल्प महोत्सव म्हणजे उत्सवा पूर्वी महिनाभर जल्लोषाचे वातावरण असते. संकुलात प्रथम स्वछता अभियान राबवून महोत्सवाची सुरुवात होते. यात अंडर आर्म क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, होम मिनिस्टर, दीपोत्सव, हळदीकुंकू, मराठी वाद्यवृंद, ग्रुप डान्स, खाद्य महोत्सव तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असते. सांस्कृतिक मंडळाचे अमर देसाई यांनी १०व्या वर्षा निमित्त, स्व:रचित गीत स्वरबद्द करून सादरीकरण केले. त्यात सोसायटीतील बारा इमारतीच्या नावाचा उल्लेख होता. गणेश मंदिरात महागणेशयाग यज्ञ पाच तास सुरू होता.
महिलांच्या मंगल चरण शोभा यात्रेच्या उत्सवाची सुरुवात झाली. श्री. अथर्व शीर्ष (सहस्त्रआवर्तन), श्री गणेश जन्म सोहळा तसेच गणेश पालखी मिरवणूक सोहळा भव्य रोषणाईत व फटाक्यांच्या आतिषबाजीने संपन्न झाला. पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.
शेवटी उपस्थित सहा हजार भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण श्री गणेश माघी उत्सव सोहळ्यास, फेडरल सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत माने, सचिव प्रदीप केदारी, खजिनदार सुबोध महाडिक, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष धनंजय पानबुडे, सचिव अजय पवार, खजिनदार शैलेश शिरवाडकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी पानबुडे, सचिव निकिता साटम, खजिनदार राधिका मयेकर, यांचे मोलाचे मार्गदर्शन व विशेष आयोजन होते.