महिलांनो स्वतःच्या आनंदा करिता छान जगा ! - - ह.भ.प. मधुरा प्रभू-अनारेडी.

महिलांनो स्वतःच्या आनंदा करिता छान जगा ! - - ह.भ.प. मधुरा प्रभू-अनारेडी.

       मुंबई : महिलांनो स्वतःच्या आनंदा करिता छान जगा व जीवनाचा आस्वाद घ्या! असे उदगार ह.भ.प.मधुरा प्रभू - अनारेडी  यांनी सावंतवाडी संस्थान मराठा समाज  आयोजित तिळगुळ समारंभात  महिलांना मार्गदर्शन करतांना केले.

    सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेचा मकर संक्रात संमेलन, संस्थेच्या दादर येथील मराठा वैभव समाजगृह-नानासाहेब सावंत सभागृहात मोठया उत्साहात संपन्न झाला.

        प्रमुख अतिथी कथा-कथनकार- मंजिरी देवरस व ह. भ.प.मधुरा प्रभू-अनारेडी सह महिला समिती प्रमुख-सुषमा राणे, समारंभाच्या अध्यक्षा- सुचेता सावंत व वैशाली सावंत व्यासपीठावर उपस्थित होत्या.

      कथा कथानकावर मंजिरी देवरस यांनी चार लघुकथा सादर केल्या व कीर्तनकार मधुरा प्रभू-अनारेडी यांनी मंजुळ आवाजात कीर्तन करून सर्व महिलांना मंत्रमुग्ध केले.

       प्रास्ताविक-सुषमा राणे, पाहुण्यांचा परिचय व स्वागत -शैला परब, संस्थेच्या कार्याचा आढावा- अंजली नाईक व आभार- नीता खानविलकर यांनी मानले. या सोहळ्याला नेहा राणे, सुरेखा ठाकूर, सुलक्षणा शेट्ये, पूर्णिमा धारगळकर वैशाली गावडे व विद्या मोरे यांचे विशेष सहकार्य होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week