
महिलांनी आपले अस्तित्व जपा, ते हरवू नका... त्याचा सत्कार करा.
महिलांनी आपले अस्तित्व जपा, ते हरवू नका... त्याचा सत्कार करा.
मुंबई : आपण आयुष्यात, ब-याच भूमिका निभावतो. बहीण, पत्नी, आई, आजी त्यात, आपण स्वतः हरवून जातो. स्माईल ने मैत्री करायला सुरुवात करा. फक्त माहीत असून उपयोग नाही. आचरणात आणा. महिलांनी आपले अस्तित्व मनसोक्त अनुभवा, प्रत्येक स्त्री मध्ये एक अप्सरा असते. प्रत्येक स्त्रीचे एक वेगळे व्यक्तिमत्व असते. "आपले अस्तित्व आपणच जपू शकतो....तेव्हा ते हरवू नका....त्याचा सत्कार करा". असे मत सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या हळदीकुंकू समारंभात निमिषा अय्यर यांनी व्याख्यानात व्यक्त केले.
सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई, यांचे हळदी कुंकू समारंभ, नानासाहेब सावंत सभागृह स्टार मॉल, ३रा मजला, न चि केळकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी संस्थेच्या महिला अध्यक्षा - शिला वारंग, प्रमुख पाहुण्यां - सीमा तोरस्कर, माजी नगरसेविका - सुचित्रा नाईक, निमिषा अय्यर व अस्मिता पवार ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
निमिषा अय्यर व अस्मिता पवार यांनी देहबोली आणि शिष्टाचार व व्यक्तिमत्व विकास यावर महिलांना मार्गदर्शन केले. महिलांना त्यांच्या अस्तित्वाची भेट घालून दिली. दोन गट करून फॅशन शो केला, त्यात कु. ओवी सावंत, सुचिता नाईक, वैशाली गावडे, अंजली नाईक, माधुरी सावंत, मनस्वी धुरी ह्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. शेवटी महिलांना उद्देशून संदेश दिला,
"विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू.... एक दिवस तरी साजरा कर, आपल्या व्यक्तिमतवाचा तू".......
कार्यक्रमाची प्रस्तावना सुलक्षणा शेट्ये व पूर्णिमा धारगळकर यांनी केली व आभार अंजली नाईक यांनी मानले.