मराठी चित्रपट - हम गया नही जिंदा है, लवकरच स्वामी भक्ताच्या भेटीला !!
मराठी चित्रपट - हम गया नही जिंदा है, लवकरच स्वामी भक्ताच्या भेटीला !!
अभिषेक निकम दिग्दर्शित श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनातील अनेक लीला तसेच भक्तांना आलेल्या अनुभवांवर आधारित मराठी चित्रपट - हम गया नही जिंदा है.
येत्या ९ मे २०२१ रोजी स्वामी पुण्यतिथीच्या शुभमुहूर्तावर भक्तांच्या भेटीस येत आहे या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन - अभिषेक निकम यांचे असुन चित्रपटात प्रमूख भूमिकेत उषा नाडकर्णी, योगेश सोमण, शुभांगी लाटकर, विघ्नेश जोशी, धनश्री भालेकर, धनश्री दामले, नेहा परांजपे, ऋषिकेश प्रधान, आणि जनार्दन कदम आहेत. स्वामी समर्थ यांच्यावर कवाली तसेच पोवाडा प्रथमच प्रेक्षकांच्या कानी पडणार आहे. असंख्य स्वामी भक्त या चित्रपटांस उदंड प्रतिसाद देतील असे चित्रपटाशी निगडीत असलेल्या प्रत्येकाचा विश्वास आहे.