
महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वतीने मोफत पुरीभाजी वाटप !!
महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वतीने मोफत पुरीभाजी वाटप !!
अत्यावश्यक सेवेतील, पोलीस, सफाई कामगार, मनपा कर्मचारी, गरजुंना दोन वेळ मोफत पुरीभाजी केंद्र, बी डी डी चाळ, इमारत क्र 17, लोअर परेल (पूर्व) येथे एक महिन्यापासून सुरू आहे.
मुंबईत लॉक डाऊन सुरू झाल्या नंतर, व हॉटेल्स बंद असल्यामुळे, शासकीय, निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचा-याची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वतीने व माजी आमदार सुनील शिंदे, नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर, शिवसेना शाखाप्रमुख दीपक बागवे यांच्या प्रयत्नाने व शिवबा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने एक महिन्यापासून विनामूल्य पोळीभाजी केंद्र सुरू केले आहे.
पोळी-भाजी केंद्रावर रोज दुपारी 10 ते 12 व सायं 7 ते 9 या वेळेत 500 पॉकेट वाटली जातात. याचा लाभ लालबाग, लोअर परळ, भायखळा, दादर, काळाचौकी, करी रोड या परिसरातील गरजू नागरिक, शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रोज घेत आहेत.
पोळी भाजी केंद्राचे व्यवस्थापन सुनील माध्याळकर, संतोष शिवगंड, संतोष शिंदे, अनिल रेडेकर, शुभम येदुडकर, विकास माळवी, राजू शिर्के व उमेश कुपेकर आदी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते करीत आहेत. या भोजनाचा गरजुंनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शिवबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष - विजय कुपेकर यांनी केले आहे.