
अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचा-यांना मोफत भोजन !!
अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचा-यांना मोफत भोजन !!
करिरोड (पश्चिम) येथे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, बैठकीच्या घरात राहणार-या चाकरमान्यांना, सफाई कामगार, पालिका कर्मचारी व गरजूंना सकाळ- रात्रौ दोन वेळ मोफत जेवणाची सोय, ना.म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा येथे केली आहे.
लॉक डाऊन जाहीर झाल्या नंतर सर्व हॉटेल्स बंद झाली. हॉटेल वर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ लागले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "महाराष्ट्रातील कोणीच उपाशी राहणार नाही" जाहीर केले. खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, महापौर किशोरी पेडणेकर व शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडये यांच्या प्रयत्नाने ना.म.जोशी मार्ग शाळेत 500/550 गरजूंना जेवणाची सोय करण्यात आली आहे.
रोज सकाळ संध्याकाळी मिळून एक हजार व्यक्तींचे जेवण केले जाते, जेवणाची व्यवस्था श्री/सौ विवेक लाड करतात. जेवण वितरणाची व्यवस्था रमेश भागवत, दीपक पडलकर व श्रीकृष्ण दळवी हे शासकीय नियमाचे पालन करून करतात.
लालबाग, परळ, लोअरपरळ, भायखळा, आर्थर रोड येथील गरजू जेवणाचा लाभ घेत आहेत. अक्षय तृतिये निमित्त शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडये यांनी जेवणासोबत सर्वाना श्रीखंड वाटप केले.