संकल्प सुरांचा.. शुभारंभ प्रयोग उत्साहात संपन्न..

संकल्प सुरांचा.. शुभारंभ प्रयोग उत्साहात संपन्न..

       मुंबई: संकल्प सुरांचा या मराठमोळ्या वाद्यवृंद शुभारंभाचा कार्यक्रम नुकताच गोरेगाव (पूर्व) येथील संकल्प सांस्कृतिक केंद्र, संकल्प संकुलात, रश्मिन मोरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.

      संकल्प संकुलातील बारा इमारतीतील नवोदित तरुण कलाकारांना एकत्रीत करून रश्मिन मोरे यांनी मराठी गीतांचा संकल्प सुरांचा" वाद्यवृंद साकारला.

          पहिल्या प्रयोगात निलेश आंगणे, शशिकांत दळवी, प्रकाश चव्हाण, अर्चना सावंत, हेमा जेकटे व सलोनी गोखले या नवोदित कलाकारांनी महाराष्ट्र गीत, कोळी गीते, चित्रपट गीते, भक्ती गीते, शेतकरी गीत, मंगळागौर गीते, गोधळ गीते, लावणी आदी गीते सादर केली. सलोनी गोखले हिने लावणी स्वतः सादर करून नृत्य ही केले. तीला रसिक प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्या वाजवून उत्फुर्त प्रतिसाद दिला. सर्व गीतांना वादक कलाकार- अवधूत मोरे, प्रवीण आकेरकर, कैलास पाटील, प्रथमेश किराळे व अतुल भोसले यांनी उत्तम साथ दिली. निवेदन उमेश सावंत यांनी केले होते.

         शुभारंभाच्या सोहळ्यास सारस्वत बँक, गोरेगाव शाखेच्या- मुख्य व्यवस्थापक- नम्रता जोशी, राजू पिंपळकर, हेमसिंग दासना, नूतन साईल, संकल्प फेडरल व सांस्कृतिक चे पदाधिकारी -धनंजय पाणबुडे, हनुमंत सुळे, सुबोध महाडिक, चंद्रकांत माने, राकेश मोरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचा सर्व खर्च  कलाकारांनी करून रसिकांसाठी प्रयोग विनामुल्य ठेवण्यात आला होता. सचिन सावंत, संदेश कदम व राजन शेवाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week