आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो !!

आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो !!

       शासकीय नियमाचे काटेकोर पालन केल्यास आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो. महाराष्ट्रात किंबहूना मुंबई व पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. पालिका प्रशासन, पोलीस, सफाई कामगार, डॉक्टर-नर्सेस अहोरात्र कोरोना विरोधात डोळ्यात तेल घालून लढा देत आहेत. 

         गोरेगाव पूर्व  दिंडोशी येथील विवेक संकल्प सोसायटीचे रहिवाशी मात्र कोरोना इमारतीत येऊ नये यासाठी आजही जागृत आहेत. सर्व राहिवाश्यांचा व्हॉट्सऍपचा ग्रुप तयार करून कार्यकारिणीने सर्व रहिवाशांचे   कौटुंबिक प्रश्न समजावून घेऊन त्यानुसार मूलभूत सुविधा म्हणजेच कडधान्य, दूध भाजीपाला, आदींची गरज पूर्ण केली.  रहिवाशी खरेदीसाठी कंपाउंडच्या बाहेर जाऊ नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष - धनंजय पाणबुडे यांनी सोसायटीसाठी दूध, भाजीपाला, फळे राहिवाश्यांच्या मागणी नुसार मागवून, त्याचे वाटप सोसायटी सोशल डिस्टन्सचे नियम वापरून व्यवस्थितरीत्या करीत आहे.

      मुलांची व ज्येष्ठ नागरिकांची काळजी वैयक्तिक रित्या घेण्यात येते. सकाळी 10 ते 12 व सायं 6 ते 7 या वेळेतच सोसायटीचे मुख्य प्रवेश द्वार उघडण्यात येते. इमारतीत बाहेरील व्यक्तीस प्रवेश नाही. सोसायटीत प्रवेश करताना, हाताला सेनिटायझर लावूनच प्रवेश दिला जातो. 

        सोसायटीचे अध्यक्ष - धनंजय पाणबुडे,  सचिव - तुषार वैद्य, खजिनदार - रामचंद्र घाडी व सर्व सहकारी नरेश नंदाविकर, दीपक जाधव, हनुमंत सुळे, भिमराव वलकुंडे, किरण नांदीवडेकर चंद्रकांत परब, संदीप सावंत व दिलीप बामणे तसेच संपूर्णत विवेक परिवारातील सर्व क्रियाशील कार्यकर्ते, कोरोनाच्या लढ्यासाठी सज्ज आहेत. सोसायटीतील प्रत्येक कुटुंबाची कार्यकर्ते व्यक्तीश: काळजी घेतात, त्यामुळे विवेक कुटुंब कोरोना विषाणूपासून आजही सुरक्षित आहेत. असे रहिवाशी सिद्धेश परब यांनी सांगितले.

       शासन, मनपा प्रशासन यांच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्यास कोरोनाच्या  महाभयंकर रोगांचा आपण नायनाट करू शकतो. आमच्या सोसायटीत आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. इतर सोसायट्यानी असेच अनुकरण करून व नियमांचे पालन करून आपण कोरोनाला महाराष्ट्रातुन घालवू  !!

   शकतो  घरीच रहा... मस्त रहा... असे विवेक संकल्प सोसायटीचे अध्यक्ष- धनंजय  पाणबुडे यांनी कळविले आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week