
शिवसेनेचे माजी आमदार सुनिल शिंदे यांनी भरला विधान परिषद आमदारकीचा फॉर्म !!
शिवसेनेचे माजी आमदार सुनिल शिंदे यांनी भरला विधान परिषद आमदारकीचा फॉर्म !!
शिवसेना विधान परिषद अधिकृत उमेदवार माजी आमदार सुनिल शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय सीएसटी येथे दाखल केला. शिंदे यांनी आपली आमदारकी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडलेली होती त्याचेच हे फळ म्हणून त्यांना पक्षातर्फे ही जबाबदारी देण्यात आली, शिंदे यांचा वरळी विभागात जनसंपर्क मोठा असून तळागाळातील नागरिकांना मदत करण्याचा त्यांचा नित्यक्रम असतो.
या दृष्टीनेच शिंदे यांना आमदारकी मिळाल्याबद्दल वरळी विभागामध्ये ठीकठिकाणी जल्लोष व्यक्त केला जात असून पेढे वाटप केले जात आहेत.
आम्ही नेहमीच जनतेचे कार्य करत आललो असून यापुढे देखील जनतेचे कार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर राहू नागरिकांना कोणत्याही समस्या असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांचे प्रश्न सोडवू असे आवाहन शिवसेनेचे पदाधिकारी आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस निशिकांत शिंदे यांनी याठिकाणी केले. शिंदे यांचा फॉर्म भरताना शिवसेनेचे पदाधिकारी मान्यवर नेते आणि वरळी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.