
मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट नामकरण करण्यासाठीचे निवेदन खासदार श्री राहुल शेवाळे यांना देण्यात आले !!
मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट नामकरण करण्यासाठीचे निवेदन खासदार श्री राहुल शेवाळे यांना देण्यात आले !!
मध्य मुंबईचे खासदार श्री राहुल शेवाळे यांना त्यांच्या कार्यालयात नानांचे स्मृतिचिन्ह व निवेदन देताना नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ऍड मनमोहन चोणकर, प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य श्री शशिकांत पावसकर, दिलिप मांलडकर, नाना प्रेमी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री सुनिल खेडेकर, संजय नागवेकर, संजय कारेकर, हेमंत कारेकर उपस्थित होते.
त्यावेळी श्री शेवाळे म्हणाले आम्ही या लोकसभेच्या अधिवेशनात हि मागणी करणारच आहोत. त्यानंतर नानांच्या स्मारका संदर्भात सुध्दा चर्चा करण्यात आली. त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील स्मारकाच्या बांधकामाबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे बैठक आयोजित करण्यासाठी विनंती करण्यात आली, त्याला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही शेवाळे यांनी दिली.