
भायखळ्यात भाजपतर्फे शासकीय योजना शिबीर !!
भारतीय जनता पार्टीच्या प्र क्र 207 च्या नगरसेविका सुरेखा रोहिदास लोखंडे यांच्यावतीने शनिवार दि.१३ नोव्हेंबर ते रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी, सकाळी १०.०० ते सायं.७.०० पर्यंत तुकाराम कुऱ्हाडे चाळ, बकरी अड्डा लसीकरण केंद्र, ऑल्पिया टॉवर समोर, मुंबई-४० येथे विविध योजनांचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये आधार कार्ड ची नवीन नोंदणी आधार कार्ड ची दुरुस्ती, ई श्रम कार्ड, सजय गांधी निराधार योजना, लसीकरण सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला सर्टिफिकेट, युनिवर्सल पास, स्मार्ट कार्ड यासारख्या विविध योजना एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होणार असून या शासकीय योजनांच्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 207 च्या नगरसेविका सुरेखा रोहिदास लोखंडे यांनी केले आहे. या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सरचिटणीस कमलेश डोके यांनी केले आहे.